BJP : भाजपा स्वतःला लोकशाहीचा राजा समजतो- नाना पटोले

नाना पटोले यांची भाजपा वर जोरदार टीका, म्हणाले - लोकशाहीमध्ये कोणीही राजा नसतो, जनता राजा असते. बावनकुळे यांच्या मुकुटावरून वाद.
Published by :
Team Lokshahi

पालकमंत्री झाल्यावर पहिल्यांदा बावनकुळे हे अमरावतीमध्ये गेले होते. बावनकुळेचं मुकुट घालून स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर राजकिय वर्तुळातून जोरदार टीका केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी प्रतिक्रिया....

भाजपा लोकशाहीचे राजे आहेत, परंतु लोकशाहीमध्ये कोणीही राजा नसतो, जनता राजा असते.... आत्ताचे सरकार स्वतःला राजा समजते आणि जनतेला प्रजा समजत आहे. बावनकुळेंना मुकुट पितळेचा घाला किंवा सोन्याचा ,भष्ट्रचारांमधून त्यांनी खूप पैसे कमावले आहेत... मुकुट सोन्याचं आहे की, पितळेचा हे बघायला कोणीही गेलं नाही, एखाद्यावेळेस मुकुट सोन्याचा आहे ही, गोष्ट त्यांनी लपवली देखील असेल. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com