Eknath Shinde : डोंबिवलीत एकनाथ शिंदेंना भाजपचा पुन्हा धक्का, अवघ्या दोन तासांत आणखी तीन नगरसेवक आणि एक परिवहन सदस्याचा भाजपात प्रवेश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Shinde) निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच अनेक पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता डोंबिवलीत एकनाथ शिंदेंना भाजपाने पुन्हा धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या दोन तासांत आणखी तीन नगरसेवक आणि एक परिवहन सदस्य भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असून सायली संजय विचारे, डॉक्टर सुनीता पाटील, महेश पाटील या नगरसेवकांचा भाजपात पक्षप्रवेश होणार आहे. संजय राणे हे परिवहन समिती सदस्य ही हाती कमळ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
डोंबिवलीत एकनाथ शिंदेंना भाजपचा पुन्हा धक्का
अवघ्या दोन तासांत आणखी तीन नगरसेवक व एक परिवहन सदस्याचा भाजपात प्रवेश
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
