Chitra Wagh
Chitra WaghTeam Lokshahi

संजय राठोड यांच्या संबंधी प्रश्न विचारताच चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या, सुपारी घेऊन...

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भडकल्या.
Published by :
Sagar Pradhan
Published on

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंत्री संजय राठोड हे चांगलेच चर्चेत राहिले होते. मंत्री संजय राठोड हे पूजा चव्हाण प्रकरणामुळे अडचणीत आले होते. मात्र, हे संपूर्ण प्रकरण पुढे आणण्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा हात होता. परंतु, आता संजय राठोड हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्री झाले आहेत. त्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पूजा चव्हाण प्रकरणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांकडून संजय राठोड यांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला असता भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भडकल्याच्या दिसून आले. त्यांनतर त्यांनी त्या पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

Chitra Wagh
जितेंद्र आव्हाड यांना अटक, सोबतच माजी खासदारासह 12 कार्यकर्तेही अटकेत?

धडकल्यानंतर काय म्हणाल्या चित्रा वाघ?

संजय राठोड यांचा विषय संपला आहे, असे तुम्ही म्हणता, मग आघाडी सरकारच्या काळात केवळ राजकीय हेतूने तुम्ही त्यांच्यावर आरोप केले का, असे विचारताच चित्रा वाघ संतापल्या. मला प्रश्न विचारता तुम्ही न्यायालय आहात की न्यायाधीश, मी पाहीन काय करायचे ते, माझी लढाई सुरू आहे, मला शिकवू नका असे सांगत, असल्या पत्रकारांना यापुढे पत्रकार परिषदेला बोलावू नका, पत्रकार सुपारी घेऊन पत्रकार परिषदेत येत आहेत. असे म्हणत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद सोडत निषेध नोंदवला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com