Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team Lokshahi

'विरोधकांनी सकाळीच हे ठरवलं होतं' अर्थसंकल्पावर विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

सकाळीच लिहून ठेवलं होतं. तीच स्क्रीप्ट ते वाचत आहेत. त्यांनी बजेट बघितलंही नाही, त्याचा अभ्यासही केला नाही.
Published by :
Sagar Pradhan
Published on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2023-24 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. आजच्या या अर्थसंकल्पावर सर्वच देशाचे लक्ष लागून होते. त्यावरच आता बजेट सादर झाल्यानंतर या बजेटवर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. विरोधकांच्या याच टीकांना आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis
...तर हा देशाचा ‘अमृत काळ’ कसा; अजित पवारांचा अर्थसंकल्पावर सवाल

प्रतिक्रियेवर मी प्रतिक्रिया द्यावी, एवढा त्या प्रतिक्रियेत दमच नाही

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. याच टीकांवर बोलताना देवेंद्र फडणीस म्हणाले की, विरोधकांनी सकाळीच हे ठरवलं होतं, की कसंही बजेट आलं तरी काय प्रतिक्रिया द्यायची. सकाळीच लिहून ठेवलं होतं. तीच स्क्रीप्ट ते वाचत आहेत. त्यांनी बजेट बघितलंही नाही, त्याचा अभ्यासही केला नाही. बजेटच्या मेरीटवरही ते बोलत नाहीत. कारण, मेरीट त्यांना पाहायचेच नाहीत. त्यांनी सकाळी जी प्रतिक्रिया ठरवली तीच प्रतिक्रिया त्यांना ऐकवायची आहे. म्हणून त्यांच्या प्रतिक्रियेवर मी प्रतिक्रिया द्यावी, एवढा त्या प्रतिक्रियेत दमच नाही.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com