Sharad Pawar | Nilesh Rane
Sharad Pawar | Nilesh RaneTeam Lokshahi

अशी राजकीय कार्यकीर्द काय कामाची? निलेश राणेंची पवारांवर बोचरी टीका

पवार साहेब एकमेव व्यक्तिमत्व असतील महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावर कोणालाच विश्वास नाही.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. हा वाद चालू असताना आता भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Sharad Pawar | Nilesh Rane
शरद पवारांनाही 50 आमदार सोडून गेले होते, पण ते खचले नाहीत : अजित पवार

काय म्हणाले निलेश राणे?

निलेश राणे यांनी ट्विटरवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पवार साहेब एकमेव व्यक्तिमत्व असतील महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावर कोणालाच विश्वास नाही, अशी राजकीय कार्यकीर्द काय कामाची?? उद्धव ठाकरे स्वतः म्हणाले होते माझं लक्ष पवार साहेबांवर होतं पण आमचे निघून गेले याचा अर्थ त्यांचा पवारांवर विश्वास नव्हता. अशी बोचरी टीका राणेंनी पवारांवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com