Pankaja Munde | Vinod Tawade
Pankaja Munde | Vinod Tawade Team Lokshahi

भाजप नेतृत्वाची घोषणा, पंकजा मुंडे, विनोद तावडेंना मोठी जवाबदारी

पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशात सहप्रभारी,तर विनोद तावडे यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी घडत असताना राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपतील अनेक नव्या चेहऱ्याना संधी मिळता आहेत. नुकताच आता भाजपाने केंद्रीय पातळीवर काही राज्यांच्या प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे.

यामध्ये भाजपने विनोद तावडे यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशात सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. याबाबतचे पत्रक भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना देखील या मध्ये केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

2020 पासून पंकजा मुंडे या राष्ट्रीय राजकारणात

2020 साली भाजपाने पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिव अशी जबाबदारी दिली होती. मात्र, राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती. मात्र पंकजा मुंडे यांना राज्यापासून दूर ठेवत केंद्रीय राजकारणात ठेवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न दिसतो आहे. मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी दक्षिणेतील मुरलीधर राव यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर सहप्रभारीपदी पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसोबत डॉ. राम शंकर कठेरीया यांची सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Pankaja Munde | Vinod Tawade
बाप्पा बाप्पा बुद्धी द्या, पुढच्या वर्षी तरी होऊ द्या, बॅनर लावून आमदार राजू पाटीलांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

पंकजा मुंडे नाराज असल्याची होत्या चर्चा

महाराष्ट्र भाजपमध्ये नेत्या पंकजा मुंडे ह्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मध्यंन्तरी तर पंकजा भाजप सोडणार अश्या चर्चा राजकीय वर्तुळात चालल्या होत्या. अशातच भाजपकडून मिळालेल्या संधी मुळे या चर्चांवर आता पूर्णविराम लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com