राजकारण
"बोलण्याचं स्वातंत्र्य नाही...", कुणाल कामरा प्रकरणावरुन जया बच्चन यांचा घणाघात
राज्य सभा खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडीओवरुन जोरदार वादंग सुरु आहेत. कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता शोदरम्यान कविता सादर केली. त्यावरुन वेगळ्या वादाला तोंड फुटले आहे. या सर्व प्रकरणामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्टुडिओचीदेखील तोडफोड केली. त्याचप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये उडी घेतली.
अशातच आता राज्य सभा खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. त्या म्हणाल्या, "प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही जेव्हा शिवसेनेमधून सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान झाला नाही का?".