गौतम अदानी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, नक्की प्रकरण काय?

गौतम अदानी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, नक्की प्रकरण काय?

शेअर्सच्या किंमतीमध्ये 388 कोटी रुपयांच्या मार्केट रेग्युलेशन वॉयलेशनच्या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारतातील श्रीमंत उद्योगपाती गौतम अदानी व त्यांचे बंधू राजेश अदानी सध्या खूप चर्चेत आले आहेत. अदानी एंटरप्रायजेसचे शेअर अफरातफर घोटाळाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. शेअर्सच्या किंमतीमध्ये 388 कोटी रुपयांच्या मार्केट रेग्युलेशन वॉयलेशनच्या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

दरम्यान हे प्रकरण 2012 चे आहे. जेव्हा SFIO ने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि प्रमोटर्सवर गुन्हेगारी कट आणि फसवणूक केल्याचा आरोप करत आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात गौतम अदानी आणि त्याचा भाऊ राजेश अदानी यांच्यासह 12 जणांची नावे आहेत.

मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मे 2014 मध्ये गौतम अदानी यांची निर्दोष मुक्तता केली होती आणि त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे आपल्या निर्णयात म्हटले होते. परंतु SFIO ने या आदेशाला आव्हान देत अदानी समूहाने काही आर्थिक व्यवहारातून कथित नफा कमावल्याचा युक्तिवाद केला. यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये सत्र न्यायालयाने आदेश रद्द करून खटला पूर्ववत केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com