Chandrahar Patil
Chandrahar Patil

Chandrahar Patil : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

डबल महाराष्ट्र केसरी विजेता चंद्रहार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Chandrahar Patil) डबल महाराष्ट्र केसरी विजेता चंद्रहार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (9 जून) संध्याकाळी 5 वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात मोठे शक्तिप्रदर्शन करत सुमारे 5000 ते 7000 कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार आहेत.

या पक्षप्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार धैर्यशील माने, सांगलीचे आमदार सुहास बाबर, मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर आणि प्रताप सरनाईक आदी नेते उपस्थित राहणार आहेत. चंद्रहार पाटील यांना शिंदे गटात प्रवेशानंतर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

चंद्रहार पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षप्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिले. “क्रीडा क्षेत्रातील अडचणी शासनाच्या सहभागाशिवाय सोडवता येत नाहीत. म्हणून समाजकार्य आणि क्रीडा क्षेत्रातील सुधारणा यासाठी आम्ही सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले

2024 लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यांना 55 हजार मते मिळाली. अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या विशाल पाटलांनी तब्बल 5.69 लाख मतांसह विजय मिळवला होता. आता चंद्रहार पाटील शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com