Nana Patole | Chandrashekhar Bawankule
Nana Patole | Chandrashekhar BawankuleTeam Lokshahi

मविआने उद्या ३ वाजेपर्यंत निवडणूक बिनविरोध केली तर टिळक कुटुंबियांना... : बावनकुळे

मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यामुळे टिळक कुटुंबिय नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
Published on

पुणे : मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदार संघात टिळक कुटुंबियांना उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र, भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यामुळे टिळक कुटुंबिय नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावरुन, पुण्यात फ्लेक्सबाजीही करण्यात आली. यानंतर भाजपमध्ये हालचालींना वेग आला असून चंद्रशेखर बावनकुळे टिळक कुटुंबियांच्या भेटीला पोहोचले. यानंतर उद्या ३ वाजेपर्यंत महाविकास आघाडीने जर ही निवडणूक बिनविरोध केली तर आम्ही टिळक कुटुंबियांना उमेदवारी देऊ, असे त्यांनी सांगितले.

Nana Patole | Chandrashekhar Bawankule
...त्यापेक्षा हे सरकारच अदानींच्या ताब्यात देऊन टाका; अंबादास दानवे संतापले

२ तारखेला शैलेश आणि कुणाल टिळक माझ्याकडे जी २० साठी आले होते. टिळक कुटुंबीय कधीच नाराज होऊ शकत नाही. मुक्तताई आमच्या नेत्या होत्या. लोकं कल्लोळ करत आहेत की टिळक कुटुंबीय नाराज आहे. पण, कोणीही नाराज नाहीय. मंत्री येत आहेत इथे पण आम्ही काय पहिल्यांदा इथे आलो नाही. पक्षामध्ये कधी ही जाणीवपूर्वक कोणालाही डावलण्यात येत नाही. उद्या ३ वाजेपर्यंत महाविकास आघाडीने जर ही निवडणूक बिनविरोध केली तर आम्ही उद्या रासने यांचा अर्ज माघारी घेऊ. आणि टिळक कुटुंबियांना उमेदवारी देऊ, असे आवाहन त्यांनी कॉंग्रेसला केले आहे.

शैल्य वाटणारच ना त्यांच्या कुटुंबातील सदस्य या विधानसभेत होत्या. आई गेल्यामुळे वाईट वाटणारच ना. काही गोष्टींचे मेरिट असते, कसबा आणि चिंचवडची परिस्थिती वेगळी आहे. कुणाल, बिडकर, घाटे हे सगळे उमेदवारांमध्ये क्षमता होती. पण, एका जागेवर एकच जण लढू शकतात, असे त्यांनी सांगितले.

नाना पटोले यांनी विनंती आहे की उद्या निवडणूक लावू नये, एक वर्ष लोकांना निवडणुकीसाठी पाठवू नये. मागच्या वेळेस पवार साहेब म्हणाले, सगळे इतर नेते म्हणाले म्हणून आम्ही अंधेरी बिनविरोध केली. आमचे कागदपत्र तयार आहेत, फॉर्म तयार आहेत. टिळक परिवाराला आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे. पण, त्यांच्याकडून (आघाडी) तसे येऊ दे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, भाजपमध्ये मलाही तिकीट मिळालं नव्हतं. त्यामुळं जात, धर्म, पंतांच्या आधारावर तिकीट दिलं जात नाही. टिळकांच्या घरी आमदारकी होतीच, दुर्दैवाने ते पद गेलं. खरं तर हा फ्लेक्स ब्राह्मण समाजाने लावलेलं आहे का? कोणीतरी खडा टाकण्याचं काम केलंय, त्याचा शोध घेतोय. ब्राह्मण समाजाचं पक्षात खूप मोठं योगदान आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com