मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला राज्याच्या विकासाचा रोडमॅप, काय झालं आणि काय होणार? जाणून घ्या
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा रोडमॅप जाहीर केला आहे. आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणते निर्णय घेण्यात आले आहेत? त्याबद्दल फडणविसांनी भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, "1 लाख 30 हजार घरगुती ग्राहकांनी रुफटॉप सोलर लावले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1 लाख 20 हजार घरांमध्ये योजनेत सोलर देणार आहोत. त्यामुळे त्यांना वीजेचे बिल येणार नाही. घरगुती ग्राहकांच्या 70 % ग्राहक हे 0 ते 100 युनिट वाद वापरतात त्यांना सोलार लावून पंतप्रधान योजनेतून अर्थात दीड कोटी ग्राहक हे वीज बिलातून मुक्त होतील".
नंतर फडणवीस म्हणाले की, "मुख्यमंत्री कृषी वाहिनी हा मोठी योजना आहे. एकूण कृषीला 16 हजार मेगावॅट वीज द्यावी लागते. देशात सर्वात जास्त कृषीला वीज महाराष्ट्रात मिळत आहे. सध्या आपण 6. 50 रुपयांची सबसिडी देत होतो. याचा भार उद्योगाला देण्यात येणाऱ्या वीजेवर पडत होता. हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी 16 हजार मेगावॅटचा काम हाती घेतली आहेत. यामध्ये 2 हजार मेगावॅट काम पूर्ण होत आले आहे. डिसेंबर 2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल. सर्व शेतकऱ्यांना आपण सोलारच्या माध्यमातून वीज पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत".
नंतर फडणवीस म्हणाले की, "सोयाबीन खरेदी संदर्भात खरेदी झाली नाही असे सांगितले जाते. एकूण सोयाबीन हमीभाव 4 हजार 812 रुपये आहे. मागील वर्षापेक्षा 292 रुपये अधिक दर होता. नाफेड, एनसीसीएफद्वारे 562 केंद्रांवर खरेदी सुरु केली. केंद्रानेही महाराष्ट्रात दोनवेळा मुदतवाढ दिली. जवळपास 11 लाख 21 हजार 385 मेट्रीक टन खरेदी केली. मध्य प्रदेशात सोयाबीनचे 6 लाख मेट्रीक टन, कर्नाटक 18 हजार मेट्रीक टन खरेदी झाली. ही सोयाबीन उत्पादक राज्यांशी तुलना केली तरीही 2 लाख मेट्रीक टन अधिक खरेदी महाराष्ट्राने केली आहे. आजपर्यंतचा खरेदी रेकॉर्ड महाराष्ट्राने मोडला आहे.