प्रार्थनास्थळावरील भोंग्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश, कालावधी आणि आवाजाची मर्यादा केली निश्चित

त्याचप्रमाणे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद असावेत.
Published by :
Team Lokshahi

विधानसभेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रार्थना स्थळ आणि मशिदीवरील भोग्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद असावेत. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच्या कालावधीमध्ये दिसवा 55 डेसीबल आणि रात्री 44 डेसीबलची आवाज मर्यादा असणे गरजेचे आहे. यापेक्षा आवाज अधिक असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत.

याबद्दल फडणवीस पुढे म्हणाले की, "कोणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी मिळणार नाही. दिलेल्या कालावधीनंतर भोंगे लावायचे असल्यास संबंधितांना पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागेल. मात्र ज्या ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे पालन केले जाणार नाही. असे केल्यास भोंगे जप्त केले जातील. या सगळ्यांवर पोलिस निरीक्षिकांचे लक्ष राहील", असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com