CM Eknath Shinde
CM Eknath ShindeTeam Lokshahi

'माझ्या दौऱ्याची त्यांनी धास्ती घेतलीय...' मुख्यमंत्र्यांचा रोख कोणाकडे?

जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत ही चांगली बाब आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी आज ठाण्यावरून विशेष रेल्वेने शेकडो कार्यकर्ते अयोध्येला रवाना झाले. या रेल्वेला मुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि कार्यकर्त्यांना अयोध्याकडे रवाना केला. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यावरून उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

CM Eknath Shinde
'उद्धव ठाकरे अहंकाराने ओतप्रोत' भाजप नेत्याची उध्दव ठाकरेंवर टीका

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

अयोध्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'माझ्या दौऱ्याची त्यांनी धास्ती घेतलीय की नाही हे मी म्हणणार नाही. पण मी सर्वांना कामाला लावलंय ही वस्तूस्थिती आहे. जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत ही चांगली बाब आहे. अशी जोरदार टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर यावेळी केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com