राजकारण
मिलिंद नार्वेकर यांच्याकडून रश्मी शुक्लांचं अभिनंदन; राजकीय वर्तुळात चर्चा
रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
थोडक्यात
रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
मिलिंद नार्वेकर यांच्याकडून रश्मी शुक्ला यांचे अभिनंदन
राजकीय वर्तुळात चर्चा
रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांचा पदभार काढून संजीव कुमार वर्मा यांच्याकडे सोपवला होता.
संजय कुमार वर्मा यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे गृह विभागाकडून आदेश त्यांना देण्यात आले आहेत. आचारसंहिता संपताच पुन्हा रश्मी शुक्लांची नियुक्ती करण्यात आली असून रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडून रश्मी शुक्ला यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर हे अभिनंदन करण्यात आले आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.