"बीडचा मणिपूर होईल...", रजनी पाटील यांचे विरोधकांवर टीकास्त्र

निमलष्करी दलांत मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आत्महत्या
Published by :
Team Lokshahi

राज्यसभेमध्ये कॉँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी त्यांच्या भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अपयशी असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता बीडचे मणीपुर होण्यास वेळ लागणार नाहीअसे एका स्थानिक शेतकऱ्याने कॉँग्रेसच्या सद्भावना यात्रेवेळी संगीतल्याचे रजनी पाटील यांनी सांगितले.

निमलष्करी दलांत मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आत्महत्या, मानसिक ताण, निवृत्तीआधीच राजीनामा देण्याचे प्रमाण वाढत आहे. सीआरपपीएफमध्ये नऊ टक्के कमी मनुष्यबळ आहे. या दलांच्या आधुनिकीकरणासाठी ४,०६९ कोटींची तरतूद केली आहे. परंतु गेल्या काही वर्षांत ९० टक्के अनुदानवाटप झालेले नाही. नारी शक्ती वंदन चा गवगवा करणाऱ्या या सरकारच्या काळात निमलष्करी दलांमध्ये महिला कर्मचा-यांचे प्रमाण फक्त चार टक्के आहे,'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com