Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar : काँग्रेस नेते वैभव ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

काँग्रेसचे युवा नेते वैभव ठाकूरसह नाशिक जिल्ह्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Ajit Pawar) काँग्रेसचे युवा नेते वैभव ठाकूरसह नाशिक जिल्ह्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार हिरामण खोसकर, आमदार विजयसिंह पंडित, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वैभव ठाकूर आणि त्यांच्या समवेत पक्षात आलेल्या सर्वांचे अजित पवार यांनी पक्षात स्वागत केले.

यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, विकास हाच केंद्रबिंदू मानून आम्ही काम करत आहोत. समाजाचे भले करायचा हा एकच ध्यास आपल्या सर्वांचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळवायचे आहे. विधानसभेत नाशिक जिल्ह्याने शंभर टक्के जागा निवडून दिल्या हे मी कधीही नाकारणार नाही.

यासोबतच ते म्हणाले की, मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, बहुजनांना आपण सत्तेत संधी दिली आहे. जेव्हा आम्ही शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांचे विचार घेऊन चालतो असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com