Devendra Fadnavis
Devendra FadnavisTeam Lokshahi

गडकरींना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, पाठीमागे...

सर्व माहिती आपल्या एका टीमने तपास केला आहे. मात्र जोपर्यंत या मागचा उद्देश लक्षात येत नाही, तोपर्यंत हा तपास सुरूच राहील.
Published by :
Sagar Pradhan
Published on

काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्यांना धमकीचे तब्बल तीन फोन आले. धमकीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर एटीएसने तात्काळ चौकशी सुरु केली. त्यानंतर असं समोर आल की, हा धमकीचा फोन एका आरोपीने कर्नाटकातील बेळगावमधील तुरुंगातून केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadnavis
ईडीच्या समन्सनंतर आयुक्त इक्बाल सिंह चहल प्रतिक्रिया; म्हणाले, चौकशीत मी...

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

गडकरींना आलेल्या धमकीच्या फोनवर बोलताना फडणवीस म्हणाले की, गडकरींना धमकीचा आला होता. त्याचा आम्ही शोध घेतला आहे आणि त्यात असे लक्षात आले की, हा फोन कर्नाटकातील बेळागावमधून आलेला आहे. यानंतर तत्काळा नागपूर पोलिसांनी बेळगाव पोलिसांच्या मदत घेतली आणि बेळगाव पोलिसांशी चर्चा करून, त्याचा शोध घेतला गेला. त्या व्यक्तीने हा धमकीचा फोन केला आहे. असे फडणवीस यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आता त्या व्यक्तीपर्यंत मोबाईल जेलमध्ये कसा पोहचला?, कोणाच्या माध्यमातून हे त्याने केले आणि का केले?, त्याचा पाठीमागे अजून कोणी आहे का? याची पडताळणी पोलीस विभाग करेन. कर्नाटक पोलीसही यामध्ये आम्हाला मदत करत आहे. याची सर्व माहिती आपल्या एका टीमने तपास केला आहे. मात्र जोपर्यंत यामागचा उद्देश लक्षात येत नाही, तोपर्यंत हा तपास सुरूच राहील. असेही फडवणीस यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com