Devendra Fadnavis on Kurla Best Accident : कुर्ला बस अपघातावर फडणवीसांच मोठं भाष्य
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत आणि आता नुकतेच विशेष अधिवेशन मुंबईत पार पडले त्यानंतर आता महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरु झाले आहे. हे अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार असून पाच दिवसीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुर्ला बस अपघातावर फडणवीसांच मोठं भाष्य केलं आहे.
टेस्ट केली तर त्यात काही असं अल्कोहोल वैगले आढळलं नाही- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बेस्ट बस अपघाताप्रकरणी चालकाची ड्रिंक अँड ड्राईव्हबद्दलची चाचणी केली तर त्यात चालकाने दारु पिली नव्हती पण तरी या संदर्भातला तपास सुरु केलेला आहे.... ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस 1300 बस विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्याची ऑर्डर देखील जमा होणार आहेत. हे खरं आहे बेस्टच्या अनेक बसेस खूप जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे नवीन बसेस खरेदी करण्यारीता 1300 बसेसची ऑर्डर देखील देण्यात आलेली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
अपघाताप्रकरणी आयुक्तांना निर्देश दिले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बेस्ट अपघाताची घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. यावर आम्ही सविस्तर निवेदन करु... केवळ एवढच सांगतो की, यानंतर काही उपाययोजना देखील आपण केलेल्या आहेत. विशेषतः या केसदरम्यान जो काही वादविवाद घडला त्याच्यामध्ये त्याची टेस्ट केली तर त्यात काही असं अल्कोहोल वैगले आढळलं नाही पण तरी या अपघाताप्रकरणी आयुक्तांना निर्देश दिले आहेत की बेस्टचे जे कोणी प्रमुख आहेत, त्यांच्यासोबत बसून एक योग्य प्लॅन बनवा, जेणेकरुन बेस्टच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपल्याला योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.