Dharmaveer 2 : जेव्हा आनंद दिघे टेंभीनाक्यावर येतात...; प्रसाद ओकने केली अष्टमीची आरती

Dharmaveer 2 : जेव्हा आनंद दिघे टेंभीनाक्यावर येतात...; प्रसाद ओकने केली अष्टमीची आरती

'धर्मवीर 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

'धर्मवीर 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ठाण्यातील टेंभीनाका येथे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी नवरात्रच्या उत्सवाला सुरुवात केली. धर्मवीर २ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. याच पार्श्वभूमीवर टेंभी नाक्यावर 'धर्मवीर 2' या सिनेमाच्या चित्रीकरणाला देवीच्या दारी अष्टमीला सुरूवात करण्यात आली. यावेळी अष्टमीला धर्मवीर आनंद दिघे साहेब आरती घेत असे. यंदाच्या अष्टमीला प्रसाद ओकने तेच दृश्य ठाणेकरांना दाखवून सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला.

प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघे यांच्या वेशभूषेत देवीची आरती केली. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धर्मवीर 2 हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com