Dhananjay Munde :  धनुभाऊंना काम मिळणार, तटकरेंच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

Dhananjay Munde : धनुभाऊंना काम मिळणार, तटकरेंच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

मुंडेंनी (Dhananjay Munde) भर कार्यक्रमात मला रिकामे ठेवू नका, काहीतरी काम द्या अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. अजितदादांनीही (Ajit Pawar) मुंडेंच्या या विनवणीला सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • अजितदादांची मुंडेंच्या विनवणीला सकारात्मक प्रतिक्रिया

  • मंत्रिपद गमावलेल्या धनंजय मुंडेंना काम मिळणार

  • दादादेखील मुंडेंसाठी पॉझिटिव्ह

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराडच्या एन्ट्रीमुळे धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) मंत्रिपद गमवावे लागले. आता याच मुंडेंनी भर कार्यक्रमात मला रिकामे ठेवू नका, काहीतरी काम द्या अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. अजितदादांनीही (Ajit Pawar) मुंडेंच्या या विनवणीला सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता, राजकीय पुनर्वसनाची धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) चर्चा रंगली आहे.

तटकरेंच्या कार्यक्रमात काय घडलं?

नागरी सत्कार रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (sunil tatkare) यांचा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. भाषणावेळी धनंजय मुंडेंनी तटकरेंनी आम्हाला कायम मार्गदर्शन करत राहावं. चुकले तर कान धरावा…नाही चुकलं तर चालतं का?…पण आता रिकामं ठेवू नका…काहीतरी जबाबदारी द्या…अशी मागणी भर मंचावरुन केली. वरिष्ठ याबाबत योग्य निर्णय घेतील, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

आता रिकामं ठेवू नका…काहीतरी जबाबदारी द्या

सरपंच संतोष देशमुख च्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचे नाव आल्यानंतर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, सार्वजनिक कार्य्रकमापासून काही काळ ते वैद्यकीय कारणास्तवदूर होते. मात्र, आता ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत असून, चुकले तर कान धरावा…नाही चुकलं तर चालतं का?…पण आता रिकामं ठेवू नका…काहीतरी जबाबदारी द्या…अशी मागणी धनंजय मुंडे यांनी भर मंचावरुन केली आहे. त्यानंतर, अजित पवारांनीही याबाबत प्रतिक्रिया देत मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल असे सकारात्मक संकेत दिले आहेत.

अजितदादा धनुभाऊंसाठी पॉझिटिव्ह

मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांनीही मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात सामाविष्ट केले जाते का? की कोणती नवी जबाबदारी दिली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण, मुंडेंनी मागणी केल्यानंतर दादांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने दादादेखील मुंडेंसाठी पॉझिटिव्ह असल्याचे चित्र तयार झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com