संजय राऊत व पत्नी वर्षा यांच्यामागे ईडी-पिडा; राऊतांच्या मुलीचे महत्वपूर्ण ट्विट

संजय राऊत व पत्नी वर्षा यांच्यामागे ईडी-पिडा; राऊतांच्या मुलीचे महत्वपूर्ण ट्विट

राऊत कुटुंबात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. अशात संजय राऊतांची मुलगी पूर्वशीचे महत्वपूर्ण ट्विट केले आहे.
Published on

मुंबई : पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहे. तर, त्यांच्यापाठोपाठ राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही ईडीने चौकशी केली आहे. यामुळे राऊत कुटुंबात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. अशात संजय राऊतांची मुलगी पूर्वशीचे महत्वपूर्ण ट्विट केले आहे.

संजय राऊत व पत्नी वर्षा यांच्यामागे ईडी-पिडा; राऊतांच्या मुलीचे महत्वपूर्ण ट्विट
मी पुन्हा येईन, पण उत्तर प्रदेशमध्ये? गुगल म्हणतयं देवेंद्र फडवीस हे 'युपी'चे उपमुख्यमंत्री

संजय राऊत यांना प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले होते. यावेळी राऊतांचे कुटुंबिय भावनिक झाले असून त्यांनी अश्रू अनावर झाले होते. यानंतर संजय राऊत यांना कोर्टात हजर केले असता त्यांना दोनदा न्यायालयीन कोठडी देण्यात आली. यादरम्यान वर्षा राऊत यांनाही मनी लॉंड्रींग प्रकरणी ईडीने समन्स बजावले होते. त्यांची शनिवारी चौकशी करण्यात आली. यामुळे राऊत कुटुंबिय मोठ्या अडचणीत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची मुलगी पूर्वशी राऊतने आता फक्त एकच मंत्र... रडायचं नाही लढायचं, असे ट्विट केले आहे.

दरम्यान, संजय राऊतांची उद्या ईडी कोठडी संपत आहे. यामुळे त्यांची पुन्हा जे. जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी होणार असून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. यामुळे न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मिळतो की कोठडी याकडे लक्ष लागून आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com