मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, वाचा कोणत्या पक्षाला किती मंत्रीपद
Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक महिना होत आला आहे. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यासंदर्भात अनेक बातम्या चर्चिल्या जात आहेत. आता मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला खातेवाटप निश्चित झाले आहे. तसेच कोणत्या पक्षाला कोणती खाती, अपक्षांनी किती स्थान, पालकमंत्रीपदाचे वाटप सर्वच निश्चित झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. यात शिंदे गटाला जास्त मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपद वाटपात 50-50 समीकरण आखण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. यात एकनाथ शिंदे यांना 15 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे 65% तर शिंदे गटाचे 35% मंत्री असणार आहेत. म्हणजेच भाजपचे एकूण 25 मंत्री बनू शकतील तर शिंदे गटाला 40 पैकी 15 पर्यंत मंत्रिपदे मिळतील. शिंदेंसोबत आलेल्या 9 मंत्र्यांची पदे कायम राहणार आहे. शिंदे गटासोबत गेलेल्या काही अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे.
2, 3 ऑगस्टला विस्तार
मंत्रिमंडळ विस्तारासाठी दोन किंवा तीन ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आला आहे. कारण एकनाथ शिंदे सरकारचा फैसला सर्वोच्च न्यायालयात एक ऑगस्टला होणार आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर या दिवशी सुनावणी होणार आहे. यानंतर याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो असेही सांगण्यात आले आहे.
शिंदेचे पाच दिल्ली दौरे
मुख्यमंत्रीपदाची शपथ 30 जून रोजी घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तब्बल पाच वेळा दिल्ली दौरा केला आहे. मात्र, त्यानंतरही राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराचा तिढा सुटलेला नाही. त्यानंतर आता शिंदे आणि शहा यांच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करुन निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.