मी शिवसेनेसोबतच; 'त्या' आमदाराने फेटाळले वृत्त

मी शिवसेनेसोबतच; 'त्या' आमदाराने फेटाळले वृत्त

एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होण्याचे वृत्त; ट्विट करत दिले स्पष्टीकरण
Published on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेतून आऊटगोईंग सुरुच असून अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होत आहेत. परंतु, यावेळी अनेक आमदारांच्या नावे अफवाही उडत आहेत. नुकतीच रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे यांना समर्थनांर्थ गुवाहटीत दाखल झाल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिध्द झाले होते. परंतु, कृपाल तुमाने यांनी ट्विट करत हे वृत्त फेटाळले आहे.

कृपाल तुमाने म्हणाले की, माझ्याशी कुणीही संपर्क केला नाही किंवा मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. मी शिवसेनेसोबतच आहे. काही ठिकाणी माझ्याबाबत काही माहिती दिली जात आहे ती संपूर्णत: चूक आहे. संयम बाळगणे हीच या घडीची गरज आहे, असे ट्विट करत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

तर, बुधवारीही उदय सामंत हेही शिंदेंच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, त्यांनीही स्पष्टीकरण देत मी शिवसेनेसोबतच असल्याचे म्हंटले होते.

दरम्यान, एकनाथ शिंदे गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहेत. आजही दीपक केसकर यांच्यासह तीन आमदार गुवाहटीतील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. यात ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे, वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि आशिष जैस्वाल, पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा समावेश आहे. त्यामुळे शिवसेना अजूनही धक्क्यातून सावरत नसल्याचे दिसते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com