Eknath Shinde PC: नाराज होऊन रडणारे नाही, आम्ही लढणारे आहोत- एकनाथ शिंदे
विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबंरला झाले आणि 23 नोव्हेंबंरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला होता. या निकालावरून विरोधीपक्षाकडून अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता त्याच्यावर तोडगा निघालेला असून यासंदर्भात महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे-
यादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की, मी स्वतःला कधीच एक मुख्यमंत्री म्हणून पाहिलं नाही मी नेहमी कॉमन मॅन म्हणून राहिलो. मुख्यमंत्री म्हणजे एक कॉमन मॅन अशी माझी धारणा आहे. कारण मी सुद्धा एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना काय असतात हे मी समजू शकतो.
नाराज होऊन रडणारे नाही आहोत आम्ही लोक लढणारे आहोत- एकनाथ शिंदे
अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याच कारण एवढचं की, राज्य आणि केंद्रसरकार असे विचाराचे सरकार जेव्हा असतात समविचारी सरकार जे असतात राज्याचा प्रगतीचा वेग हा अतिशय गतीमान होतो. म्हणूनच माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खुप समाधानी आहे. आम्हाला आता बोलत होते कुठे गायब झाले, कुठे नाराज झाले... आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही आहोत आम्ही लोक लढणारे आहोत. लढून काम करणारे आहोत.
लाडक्या बहिणींमुळे लाडका भाऊ ही ओळख मिळाली- एकनाथ शिंदे
आम्ही जे काम केलं, आम्ही जे निर्णय घेतले आणि त्याचसोबत आम्ही जी सकारात्मकता दाखवली यामुळे हे सगळ झालेलं आहे. म्हणूनच लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली. "म्हणून मी त्यांचा सख्खा लाडका भाऊ झालो... ही जी ओळख मला निर्माण झाली कोट्यवधी लाडक्या बहिणींमुळे त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.