राऊतांच्या घरी मिळालेल्या पैशांच्या पाकिटावर 'शिंदें'चे नाव, मुख्यमंत्री म्हणाले...

राऊतांच्या घरी मिळालेल्या पैशांच्या पाकिटावर 'शिंदें'चे नाव, मुख्यमंत्री म्हणाले...

राऊतांच्या घरी मिळालेल्या पैशांच्या पाकिटावर Eknath Shinde यांनी प्रतिक्रिया दिली
Published by :
Team Lokshahi
Published on

अमोल धर्माधिकारी | पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरातून ईडीने (ED) अटक 11.50 लाख रुपये जप्त केले आहेत. त्यामधील एका पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव लिहील्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. यावर आज अखेर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊतांच्या घरी मिळालेल्या पैशांच्या पाकिटावर 'शिंदें'चे नाव, मुख्यमंत्री म्हणाले...
मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्याला ग्रहण! 'एकनाथ शिंदे' उद्यानावरुन वाद, उद्घाटन सोहळाच रद्द

संजय राऊतांच्या घरातून 11 लाख 50 हजाराची रक्कम ईडीने जप्त केली आहे. त्यापैकी 10 लाख रुपये पक्षाचे होते, त्यावर एकनाथ शिंदे, अयोध्या असे लिहिलेले होते. यासंदर्भात प्रश्न विचारताच शिंदे म्हणाले, पैसे कोणाच्या घरी मिळालेत? मग ते त्यांनीच लिहिलं असेल त्यांना विचारायला हवं, असा आरोप त्यांनी केला आहे.

किती दिवस दोघेच सरकार चालवणार? असा विरोधकांकडून सातत्याने विचारण्यात येत आहे. अरे पण सरकार चांगलं चाललंय की नाही? मग ? आम्ही खूप काम करतोय. लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करू, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राऊतांच्या घरी मिळालेल्या पैशांच्या पाकिटावर 'शिंदें'चे नाव, मुख्यमंत्री म्हणाले...
उध्दव ठाकरेंना एकटं पाडण्याचा गद्दारांचा कट; आदित्य ठाकरेंचा आरोप

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, कोविड स्थिती आणि विविध योजनांचा आढावा घेतला आहे. 18 वर्षांपुढील सगळ्यांना बूस्टर डोस मिळावा याची बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली. तीर्थक्षेत्र विकासाचा वेग वाढवणे. रिंग रोडबाबत चर्चा झाली. केंद्राशी निगडीत प्रकल्प, आणि संबंधित प्रलंबित प्रश्नांची सूची करण्याची सूचना करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या घरावर, सोशल मीडिया प्रोफाईलवर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे. यानुसार घराघरावर तिरंगा फडकला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन सगळ्यांनी एकत्र काम करावे लागेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

लोकांचे लवकर काम व्हावे, क्वालिटीचे व्हावे असा सरकारचा उद्देश आहे. क्वालिटीसाठी मॉनिटरिंग झाले पाहिजे. लोकप्रतिनिधीच्या सूचनांचा विचार शासन सकारात्मक करेल. पूरस्थितीत मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोली दौरा केला. परिस्थितीचा आढावा घेतला. हेलिकॉप्टर वापरण्यासारखी स्थिती नसतानाही आम्ही थांबलो नाही, रस्ता मार्गाने नुकसानाग्रस्त ठिकाणी गेलो. आमची सर्व यंत्रणा अलर्ट होती. पंचनामे वेळेत व्हावेत अशा सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com