Eknath Shinde: गेल्या अडीच वर्षातील आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक; शिंदेंच वक्तव्य

एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षातील निर्णयांना ऐतिहासिक म्हटले; शिंदेंच वक्तव्य
Published by :
Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, मात्र महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली.

माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खुप समाधानी आहे- एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले की, जनतेचे मी आभार मानेन कारण त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील प्रोत्साहन दिलं. यासर्व अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याच कारण एवढचं की, राज्य आणि केंद्रसरकार असे विचाराचे सरकार जेव्हा असतात समविचारी सरकार जे असतात राज्याचा प्रगतीचा वेग हा अतिशय गतीमान होतो. म्हणूनच माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खुप समाधानी आहे.

राज्याला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केले- एकनाथ शिंदे

आम्ही घेतलेले जे निर्णय होते ते ऐतिहासिक आहेत. आतापर्यंत आलेल्या सरकारमध्ये कोणीही असे निर्णय घेतलेले नव्हते आणि त्याचे साक्षीदार संपूर्ण जनता आहे. आम्ही सगळ्यांचे विषय सोडवले आहेत कोणाचे विषय ठेवले नाहीत. राज्याला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com