'लॉकडाऊन हा काही व्यक्तींचा आवडता विषय' मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
लॉकडाऊन हा काही व्यक्तींचा आवडता विषय होता तेव्हा. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत का राज्य चालतं का? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' संवाद महाराष्ट्राच्या प्रगतीचा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
लॉकडाऊन हा काही व्यक्तींचा आवडता विषय होता तेव्हा. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत का राज्य चालतं का? फेस टू फेस असा सरकार चालत. मुख्यमंत्री हा काय फक्त बंगल्यात बसायला आहे का? मुख्यमंत्री हा लोकांमध्ये गेला पाहिजे.
आता इथे येता येता 100 सह्या केल्या असतील मुख्यमंत्री सहायता निधीच्या. या दोन वर्षात 300 कोटी रुपये सहायता निधी मधून दिले. माझ्या एका सहीने कोणाचा जीव वाचत असेल तर माझा पेन कशाला पाहिजे. म्हणून मी दोन दोन पेन आता ठेवतो, असं ते म्हणाले.