शिवसेनेला धक्का देणाऱ्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंची पक्षातून हकालपट्टी, सेनेला फटका

शिवसेनेला धक्का देणाऱ्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंची पक्षातून हकालपट्टी, सेनेला फटका

शिवसेनेच्या विभाग क्रमांक १ च्या माजी नगरसेविका आणि पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि महिला उपविभाग संघटक गौरी खानविलकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईतील काही आमदार सहभागी झाले आहेत. अशातच शिवसेनेच्या विभाग क्रमांक १ च्या माजी नगरसेविका आणि पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि महिला उपविभाग संघटक गौरी खानविलकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेला धक्का देणाऱ्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंची पक्षातून हकालपट्टी, सेनेला फटका
देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंच्या भेटीला जाणार, कारण...

शीतल म्हात्रे यांनी काल मंगळवारी काही कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना साथ देत एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

शिवसेनेला धक्का देणाऱ्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंची पक्षातून हकालपट्टी, सेनेला फटका
Presidential election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य मुंबईत दाखल

आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसोबत उभे आहोत. आम्ही रस्त्यावर उभे राहणारे शिवसैनिक आहोत. शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर कायम राहणार आहे. आज गुवाहाटीत बसले आहेत, परंतु शिवसेनेला शून्यातून उभं करण्याची सवय आहे, असा टोला म्हात्रे यांनी शिंदे गटाला लगावला होता.

शीतल म्हात्रे यांच्यावर गंभीर गुन्हे असल्याचं समोर आलं आहे. शीतल म्हात्रे यांनी कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून शिंदेंच्या गटाला समर्थन दिलं का? असा सवाल उपस्थितीत केला जातोय. एका २२ वर्षीय मुलाला मारहाण केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ८ जुलैला एफआयआर दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला समर्थन देत प्रवेश केला आहे.

कोण आहेत शीतल म्हात्रे?

शितल म्हात्रे शिवसेनेच्या प्रवक्त्या होत्या. उत्तर मुंबईतील दहिसरच्या वॉर्ड नंबर ८ मधून दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली. २०१२ मध्ये त्या पहिल्यांदा निवडणूक जिंकल्या. त्यानंतर २०१७ मध्येही त्या मुंबई महानगरपालिकेत निवडून गेल्या होत्या. शिवसेनेच्या मुंबईतील एक आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. अलिबाग-पेण संपर्क संघटक म्हणूनही त्यांच्या खांद्यावर धुरा देण्यात आली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com