Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण
वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण सुरु आहे. मनोज जरांगेच्या उपोषणाला प्रतिउत्तर म्हणून हे उपोषण सुरु आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आरोग्य पथकाकडून दोघांची आरोग्य तपासणी मात्र लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा मात्र उपचार घेण्यास नकार दिला आहे.
महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो. लोकसभेच्या निवडणूका या प्रश्नाभवतीच फिरले आहेत आणि आता विधानसभेच्या निवडणूकीमध्ये त्यांना तेच करायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष ओबीसीच्या प्रश्नावर, आरक्षणाच्या प्रश्नावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. अजित पवार तिकडे बैठका घेतात, उद्धवजी ठाकरे तिकडे बैठका घेतात, भाजपा तिकडे बैठका घेतात, तुतारीवाले तिकडे बैठका घेतात तुम्हाला सामाजिक न्याय या गोष्टी काही पडले आहेत की नाही पडले, तुम्हाला ओबीसींच्या प्रश्नांचं काही आहे की नाही असे लक्ष्मण हाके म्हणाले.
गेल्या 2020 पासून सातत्याने ओबीसींवर जो होणारा अन्याय आहे सरकार कोणाचीही असो परंतू ओबीसींच्या पाठीत खंजीर खूपसन्याच्या वारंवार आम्हाला प्रत्येय आलेला आहे. गेल्या 2020 पासून ओबीसींचे स्थानिक स्वराज्य आरक्षण घालवण्याचं काम सर्वच प्रस्थापित मंडळीने केलेलं आहे. ज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आता महायुतीचं सरकार आहे. यांनी कुठेही कोर्टामध्ये आरक्षम वाचवण्यासाठी किंवा आरक्षणपूर्वक करण्यासाठी प्रयत्न केलेलं नाही. मी वारंवार सांगत आलो आहे की 288 नाही की 88 उमेदवार उभे करा. एकही उमेदवार करणार नाहीत ते फक्त गरीब मराठ्यांना फसवायचं असं नवनाथ वाघमारे म्हणाले.