वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश
वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश आहे. प्रकाश आंबेडकरांकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आहे. रावेरमधून तृतीयपंथी शमिशा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रावेर, सिंदखेडराजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, साकोली, लोहा, औरंगाबाद, शेवगाव, अनापूर विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
वंचितला लोकसभा निवडणूकीमध्ये यश आले नाही. मविआ सोबत त्यांचं बोलणं यशस्वी न झाल्याने लोकसभेत स्वबळावर लढले. या यादीत मराठा, बौद्ध, मुस्लीम, ओबीसी, भटक्या जमातीच्या प्रतिनिधींना उमेदवारी देण्यात आली आहे. एकीकडे मतदार संघाचे वाटप राजकीय पक्षांमध्ये सुरू असताना प्रकाश आंबेडकरांनी आपली पहिली यादी जाहीर ही करून टाकली आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठीही बराच वेळ मिळणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील मतदारसंघांमध्ये रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, "आमच्यावर काहीही आरोप होत असले तरी आम्ही राज्यात सध्या सर्वच प्रमुख पक्षांचं सुरू असलेलं एकजातीय राजकारण मोडून काढण्यासाठी विविध समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे," असं या पत्रकार परिषदे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.