Tejasvee Ghosalkar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का; माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar ) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.

तेजस्वी घोसाळकर यांनी व्हॉट्सअॅपद्वारे विभागप्रमुखांकडे राजीनामा सादर केला असून यातच तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com