राजकारण
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज गणेश नाईकांचा जनता दरबार, राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा
एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज गणेश नाईक यांचा आज जनता दरबार होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज गणेश नाईक यांचा आज जनता दरबार होणार आहे. ठाण्यात आज गणेश नाईक जनता दरबार घेणार असून आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत.
खारकर आळी येथे जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
यातच गणेश नाईक यांच्यानंतर संजय केळकर आणि निरंजन डावखरे हे देखील आठवड्यातून दोन दिवस ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आठवड्यातून दोन दिवस भाजपकडूनही ठाणेकरांसाठी जनता दरबार ठेवण्यात आला आहे.