राजकारण
Girish Mahajan : रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे पवारांकडून संकेत; गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
जामखेड येथील सभेत शरद पवार यांनी नी रोहित पवार यांचे मंत्रीपदाचे संकेत दिले.
जामखेड येथील सभेत शरद पवार यांनी नी रोहित पवार यांचे मंत्रीपदाचे संकेत दिले. शरद पवार म्हणाले की, रोहितची पहिली 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि नंतरची वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी.
ही महाराष्ट्राची सेवा इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची ही सेवा करण्याचं कर्तृत्व ज्याच्यामध्ये आहे त्याच्याबाबत वर्ष, सहा महिने पद आहे की नाही याची चिंता करु नये.
यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, त्यासाठी सरकार यावं लागते. बहुमत यावं लागते. मंत्री तर सगळ्यांना व्हायचं आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, बघितलं आपण सगळे कोट, जॅकेट घालून फिरत आहेत. त्यासाठी मला वाटतं की, सरकार आलं पाहिजे, बहुमत आलं पाहिजे. 145 आमदार निवडून आलं पाहिजे. असे गिरीश महाजन म्हणाले.