...मग मुख्यमंत्री पद अजित पवारांना द्या; सुप्रिया सुळे यांची मागणी

...मग मुख्यमंत्री पद अजित पवारांना द्या; सुप्रिया सुळे यांची मागणी

'वेदांता'वरून पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन; सुप्रिया सुळेंचा आंदोलनात सहभाग
Published on

अमोल धर्माधिकारी | पुणे : माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुमचं मुख्यमंत्री पद काही काळ अजित पवारांना द्या, आम्ही तुम्हाला त्यापेक्षा मोठ पद देऊ. चालेल का, असा खोचक प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

वेदांता फॉक्सकॉन ग्रुपचा एक लाख 54 हजार कोटीचा प्रकल्प महाराष्ट्रमध्ये येणार होता. परंतु, ईडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता इतर राज्यात जाणार आहे. या मधून महाराष्ट्रातील हजारो युवक बेरोजगार होणार आहेत. या ईडी सरकारविरोधात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की यापेक्षा मोठा प्रोजेक्ट राज्यासाठी देऊ यावर सुळे यांनी शिंदे याना टोला लगावला आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुमचं मुख्यमंत्री पद काही काळ अजित पवारांना द्या, आम्ही तुम्हाला त्यापेक्षा मोठ पद देऊ. चालेल का, असा खोचक प्रश्न त्यांनी शिंदेंना विचारला आहे.

उदय सामंत आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये मिनिस्टर होते, हे खर आहे ना ? त्यांना विस्मरण झालं असेल मला तरी अजून झाले नाही. आत्ताचे मुख्यमंत्री त्याकाळी अडीच वर्षे आमच्यात होते आणि तेही शिवसेनेचे होते, आणि हा निर्णय सेनेच्या मंत्र्यांनी घेतला ना डिपार्टमेंट त्यांच्याकडेच होते, अशी आठवण देखील त्यांनी करुन दिली.

सर्व पक्षांना विनंती आहे की हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि अर्थकारणाचा आहे. सर्व राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्रातील नेत्यांना भेटून हा प्रोजेक्ट मेरीटवर राज्यातच राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं विमानात बसून दिल्लीत जावं आणि पंतप्रधानांना विनंती करुन हा प्रोजेक्ट राज्यातच ठेवावा अशी विनंती करावी, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com