सरकार आल्यास समान नागरी कायदा आणणार: हिमाचल प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा

सरकार आल्यास समान नागरी कायदा आणणार: हिमाचल प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा

हिमाचलमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने आज आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले.
Published on

शिमला : हिमाचलमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने आज आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शिमला येथे निवडणूक जहिरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये निवडणूक जिंकल्यास समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

सरकार आल्यास समान नागरी कायदा आणणार: हिमाचल प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा
शिवसेनेचा आरोप ठरतोय खरा; नोटाला सर्वाधिक मते

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीसाठी भाजप 11 ठराव घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणाला आहे. यासोबतच भाजपने आपल्या जाहीरनाम्यात सर्व घटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने दिली आहेत. पुन्हा सरकार स्थापन झाल्यास किसान सन्मान निधीमध्ये वार्षिक 3000 रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. 8 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी वाढतील. आम्ही सर्व गावे पक्क्या रस्त्यांनी जोडू. शक्ती नावाची योजना राबवणार, ज्यामध्ये धार्मिक स्थळांच्या आसपास पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 12000 कोटी रुपये खर्च केले जातील. सफरचंदांच्या पॅकेजिंगवर 12 टक्के जीएसटी असेल.

सरकार आल्यास समान नागरी कायदा आणणार: हिमाचल प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा
नोटाला पडणारा मतांचा आकडा हे भाजपचे षडयंत्र; अंबादास दानवेंचा आरोप

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, सरकार स्थापन झाल्यास भाजप हिमाचल प्रदेशमध्ये 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील. शहीद जवानांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करणार आहे. आमचे सरकार वक्फ बोर्डाच्या जमिनीचे सर्वेक्षण करणार असून बेकायदेशीर असलेल्यांवर कारवाई केली जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात समानता आणणार आहे.

तसेच, मुलींच्या लग्नात दिली जाणारी रक्कम 21000 वरून 51000 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.12वी नंतर कॉलेजला जाणाऱ्या मुलींना स्कूटी दिली जाईल. गरीब महिलांना वर्षाला ३ मोफत सिलिंडर देणार. 30 वर्षांवरील महिलांना अटल पेन्शन योजनेशी जोडले जाईल. 12वीतील पहिल्या 5000 मुलींना दरमहा 25000 रुपये दिले जातील, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com