यामुळे खाते वाटपाला उशीर; गुलाबराव पाटलांनी सांगितले कारण, तिसरा भिडू...

तिसरा भिडू आल्यानं खाते वाटपाला उशीर होत असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले आहे.
Published by :
Team Lokshahi

जळगाव: तिसरा भिडू आल्याने खाते वाटपाबाबत थोडी गडबड होत आहे, असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. खाते वाटपाला जरी विलंब होत असला तरी खाते वाटपावरून कोणाची नाराजी नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अर्थ खात्याच्या बाबतीत वरिष्ठांचा निर्णय सर्वांना मान्य असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात आहेत. तसा कुठलाही प्रकार नसून तीन पार्टनरमुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे. दरम्यान, आज-उद्यापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा विश्वासही गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com