Gulabrao Patil: गुलाबराव पाटलांना पुन्हा पाणीपुरवठा खातं; पाहा खातेवाटपनंतर पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना पुन्हा पाणीपुरवठा खातं. राज्यात पाणीपुरवठा योजनांबाबत त्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया.
Published by :
Team Lokshahi

शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा पाणीपुरवठा खातं आलं आहे. महाराष्ट्रात अजूनही 40 टक्के पाणीपुरवठा योजना पुर्ण करण्याचं आव्हान समोर असल्याचं गुलाबराव पाटीलांनी म्हटलं आहे.

पुढे गुलाबराव पाटील म्हणाले की, माझ्याकडे पूर्वी असलेलं खातच पुन्हा मला मिळाला आहे. राज्यात पाणीपुरवठाच्या योजना या काही प्रमाणात पूर्ण झाल्या असून काही अद्याप प्रलंबित आहेत. पाच वर्षाच्या काळात पाणीपुरवठा योजनेचा मला अनुभव असल्याने प्रलंबित असलेल्या योजनांना गती मिळेल.

ग्रामीण पाणीपुरवठा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय असतो, त्यामुळे माझ्यावर पुन्हा विश्वास टाकून मला हे खाता देण्यात आलं याचा आनंद आहे. पाणीपुरवठा खात्यात मला पुण्याचा काम करण्याची संधी मिळाली आहे. राज्यात काही ठिकाणी ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठ्याच्या पाणीपुरवठा योद्धांची कामे हे संथ गतीने सुरू आहे. जी काम थांबले आहे, त्यांना ब्लॅक लिस्ट करून ती पुन्हा कशी सुरू करता येतील यासाठी मी प्रयत्न करणार.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com