स्वतःची बायको सोबत ठेवली की, विनयभंग होत नसतो, सदावर्ते यांची आव्हाडांवर टीका

स्वतःची बायको सोबत ठेवली की, विनयभंग होत नसतो, सदावर्ते यांची आव्हाडांवर टीका

स्वतंत्र मराठवाडा झालाचं पाहिजे. विरोध झाल्यास कायद्यानं उत्तर देणार, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. तर, स्वतंत्र मराठवाड्याचा विरोध मोडून काढू.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात एकीकडे राजकीय गदारोळ सुरु असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बासवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूर शहर आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच गोंधळ सुरु झाला. अशातच स्वतंत्र मराठवाडा आणि विदर्भ मागणीची जोर धरू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वतंत्र मराठवाडा झालाचं पाहिजे. विरोध झाल्यास कायद्यानं उत्तर देणार, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी उस्मानाबादमध्ये दिला. स्वतंत्र मराठवाडा परिषदेसाठी गुणरत्न सदावर्ते उस्मानाबादमध्ये होते. त्यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

स्वतःची बायको सोबत ठेवली की, विनयभंग होत नसतो, सदावर्ते यांची आव्हाडांवर टीका
आता हे कुणाचा बळी द्यायला चालले, अजित पवारांची शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर खोचक टीका

काय म्हणाले सदावर्ते?

उस्मानाबादमध्ये बोलत असताना सदावर्ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड वो शरद पवार स्व:ताची बायको सोबत ठेवली की, विनयभंगाचे आरोप होत नसतात. विनयभंगही होत नसतो, असं विधान त्यांनी केलं. खरं खरं प्रेम सोबत ठेवायचं. भगिनींचा आदर राखला पाहिजे, या भावनेतून जगायचं. हे धडे तुम्हाला कोणी देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तुम्ही एका अत्याचारीत महिलेला जातीसोबत घेऊन बोललात. हे अत्यंत वेदनादायी आणि चुकीचं आहे. महिला आयोग नक्की कारवाई करेल, ही भावना आहे. दिल्लीत भगिनीची दिल्लीत हत्या झाली. त्याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि बिळातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कलम ३४ खाली आरोपी करून गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

स्वतंत्र मराठवाडा झालाचं पाहिजे. विरोध झाल्यास कायद्यानं उत्तर देणार, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. तर, स्वतंत्र मराठवाड्याचा विरोध मोडून काढू. कोर्टाबाहेर रस्त्यावरदेखील लढू, असा इशारा उस्मानाबादमध्ये संवाद परिषदेचे आयोजन करणारे आयोजक रेवन भोसले यांनी आक्रमक पावित्रा घेतला. उस्मानाबादमध्ये मराठा संघटनांकडून गुणरत्न सदावर्ते यांचा जाहीर निषेध करण्यात आला. स्वतंत्र मराठवाडा मागणीवरून राजकारण चांगलंच पेटलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com