Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ आज काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार

Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ आज काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार

आज दुपारी 1 वाजता स्वीकारणार पदभार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • हर्षवर्धन सपकाळ स्वीकारणार काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार

  • आज दुपारी 1 वाजता स्वीकारणार पदभार

  • हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज हर्षवर्धन सपकाळ हे पदभार स्वीकारणार आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आज दुपारी 1 वाजता ते पदभार स्वीकारणार असून बिर्ला मातोश्री सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ते पदभार स्वीकारतील आणि त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com