anil deshmukh
anil deshmukhTeam Lokshahi

संजय राऊतांबरोबरच अनिल देशमुखांची दिवाळीही जेलमध्येच, कोर्टाने जमीन अर्ज फेटाळला

सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन विशेष न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळला
Published by :
Sagar Pradhan
Published on

नुकताच संजय राऊत यांच्या जमीन अर्जावर न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाने राऊतांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सोबतच आता राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांना सुद्धा कोर्टाने धक्का दिला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन विशेष न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळला आहे. त्यामुळे अनिल देशमुखांची दिवाळी सुद्धा राऊतांसारखी जेलमध्येच होणार आहे.

काय आहे प्रकरण?

अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनी पत्रातून हे आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com