Nitin Gadkari : "महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही..." केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य चर्चेत
महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे . महाराष्ट्रामध्ये आमच्या जातील फार महत्व नाही मात्र तेच उत्तर भारतात ब्राह्मणांना फार महत्व आहे. तिकडे दुबे, चतुर्वेदी या आडनावाच्या लोकांची फार चलती असते. राजकारणात त्यांचे प्राबल्य आहे. उत्तर भारतात ब्राह्मण समाजाचे मोठे वर्चस्व आहे ,अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. गडकरी यांनी केलेल्या या विधानाची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
सध्या भाषेवरून राज्यात वाद सुरु असताना आता जातीवरून सुद्धा वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत. नागपूर येथे अल इब्राहिम शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी आपल्या जातीबद्दलची व्यथा उघडपणे मांडली.राज्यामधील सामाजिक वास्तव त्यांनी लोकांपुढे मांडले. नितीन गडकरी म्हणाले, “मी ब्राह्मण आहे. मात्र, महाराष्ट्रात ब्राह्मणांचे फार चालत नाही. त्यांना इथे फारसे महत्त्वही नाही. पण, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मण जातीला खूप महत्त्व आहे.
तिकडे दुबे, मिश्रा, पांडे, चतुर्वेदी आदींची खूप चलती असते. त्यांचा तिथे फार मोठा दबदबा आहे. मी एकदा उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमाला गेलो असता तिथे सर्वजण माझ्याकडे आले. म्हणाले, ‘पंडित अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आमच्या समाजाचा कुणी दमदार नेता असेल तर ते तुम्ही आहात.’ मी म्हणालो, ‘मीच का?’ त्यांनी म्हटलं, ‘कारण तुम्ही ब्राह्मण आहात ’ मग मी म्हणालो, ‘मी जात-पात मानत नाही. तुम्ही मला हे का सांगत आहात?” मी जात पात मानत नाही त्यामुळे मी केवळ तुमचा नसून सगळ्यांचा आहे सर्व समाजाचा आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
“शिक्षण ही आपली मोठी शक्ती आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही समाजाचा विकास होऊ शकत नाही. अनेक लोक ट्रक ड्रायव्हर, चहाचे दुकान अशी छोटीमोठी कामे करतात . त्यांच्यात चांगले कला कौशल्य असूनही ते फक्त शिक्षणाअभावी मागे पडलेत. लोक तुम्हाला तुमच्या कामाने, कार्याने, गुणवत्तेने, कौशल्याने ओळखतात. केवळ गुण हे यशाचे मापदंड नसतात. जे विद्यार्थी फर्स्ट क्लास आणि मेरिटमध्ये येत होते, त्यांची वकिली आज फार चालत नाही. मात्र,आमच्यासारखे जे विद्यार्थी बदमाशी करत होते, ते कोटीत कमाई करत आहेत,” असेही यावेळी गडकरी यांनी सांगितलं.