Indian Delegation : पाकिस्तानचा भांडाफोड करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ सज्ज; कोण कुठे जाणार? जाणून घ्या...
भारत - पाकिस्तान तणावादरम्यान भारताने अनेक देशांमध्ये खासदारांचं शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला असून यात भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षातील खासदारांचाही समावेश आहे. यादरम्यान टीम ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती सर्व देशांत देईल आणि पाकिस्तानच्या दहशतवादाचाही पर्दाफाश केला जाईल.
या यादीत भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जेडीयूचे संजय कुमार, द्रमुकच्या कनिमोझी, राष्ट्रवादी (शरद पवार) सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. भारतीय शिष्टमंडळ उद्यापासून परदेश दौऱ्यावर निघणार आहे.
ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला देण्यासाठी आणि पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारचे शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज या शिष्टमंडळाला मार्गदर्शन केले. दरम्यान कोणत्या शिष्टमंडळात कोणाचा समावेश आहे, ते जाणून घ्या...
शिष्टमंडळ 1
शिष्टमंडळ 1 मध्ये भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि अल्जेरियाला भेट देणार असून, यांच्या शिष्टमंडळात भाजप खासदार निशिकांत दुबे, फंगन कोन्याक, रेखा शर्मा, असदुद्दीन ओवेसी (एआयएमआयएम), सतनाम संधू (नामांकित), माजी मंत्री गुलाम नबी आझाद आणि माजी परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळ 2
शिष्टमंडळ 2 मध्ये भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन, इटली आणि डेन्मार्कला भेट देणार असून, यांच्या शिष्टमंडळात भाजपचे दग्गुबती पुरंदेश्वरी, प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना-यूबीटी), गुलाम नबी खटाना (नामांकित), अमर सिंह (काँग्रेस), समिक भट्टाचार्य (भाजप), माजी केंद्रीय मंत्री एमजे अकबर आणि माजी राजनयिक पंकज सरन यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळ 3
शिष्टमंडळ 3 मध्ये जेडीयूचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जपान, कोरिया प्रजासत्ताक, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया येथे भेट देणार असून, या शिष्टमंडळात भाजपचे अपराजिता सारंगी, अभिषेक बॅनर्जी (टीएमसी), ब्रिजलाल (भाजप), जॉन ब्रिटास (सीपीएम), प्रदान बरुआ (भाजप), डॉ हेमांग जोशी (भाजप), काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि राजदूत मोहन कुमार यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळ 4
शिष्टमंडळ 4 मध्ये शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ युएई, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि लायबेरियाला येथे जाणार असून, या शिष्टमंडळात भाजप बन्सुरी स्वराज, मोहम्मद बसीर (आययूएमएल), अतुल गर्ग (भाजप), सस्मित पात्रा (बीजेडी), मनन कुमार मिश्रा (भाजप), एस. एस. अहलुवालिया भाजप नेते आणि राजदूत सुजन चिनॉय यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळ 5
शिष्टमंडळ 5 हे अमेरिका, पनामा, गयाना, कोलंबिया आणि ब्राझीलला जाणार असून, यात शांभवी (एलजेपी रामविलास), सरफराज अहमद (जेएमएम), जीएम हरीश बालयोगी (टीडीपी), शशांक मणी त्रिपाठी (भाजप), भुवनेश्वर कलिता (भाजप), मिलिंद देवरा (शिवसेना), तेजस्वी सूर्या (भाजप) आणि माजी राजनयिक तरनजीत संधू यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळ 6
शिष्टमंडळ 6 मध्ये द्रमुक खासदार कनिमोझी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ रशिया, स्लोव्हेनिया, ग्रीस, लाटविया आणि स्पेनला जाणार असून या शिष्टमंडळात राजीव राय (समाजवादी पार्टी), अल्ताफ अहमद (नॅशनल कॉन्फरन्स), कॅप्टन ब्रिजेश चौटा (भाजप), प्रेमचंद गुप्ता (आरजेडी), अशोक कुमार मित्तल (आम आदमी पार्टी), आंबेडकर मंजीव पुरी आणि राजदूत जावेद अश्रफ यांचा समावेश आहे.