Eknath Shinde vs Uddhav Thackeray
राजकारण
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेनेचं पुन्हा 'ऑपरेशन टायगर', ठाकरेंचे 5 खासदार शिंदेंच्या गळाला?
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूंकप होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
(Eknath Shinde vs Uddhav Thackeray) महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूंकप होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. शिवसेनेकडून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवलं जात असून ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले होते. विधानसभेतील पराभव आणि एकूण राजकीय परिस्थिती बघता ठाकरे गटाला गळती लागलेली आहे. आता 5 खासदार ठाकरेंची साथ सोडण्याच्या चर्चेने जोर पकडलाय.
राजकीय भवितव्याची चिंतेमुळे अनेकजण ठाकरेंची साथ सोडत असल्याचं बोललं जात असून ठाकरेंचे कोणते 5 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.