...अन् जयंत पाटलांनी एसटीचे स्टेरिंग हातात घेत चालवली बस

...अन् जयंत पाटलांनी एसटीचे स्टेरिंग हातात घेत चालवली बस

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट एसटी चालवण्याचा अनुभव घेतला.
Published on

संजय देसाई | सांगली : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट एसटी चालवण्याचा अनुभव घेतला. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी इस्लामपूर आगारामध्ये जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर थेट एसटीचा स्टेरिंग हातात घेऊन फेरफटका देखील मारला.

एसटीच्या ड्रायव्हर सीटवर माजी मंत्री जयंत पाटलांनी बसत स्टेरिंग हातात घेऊन एसटी चालवण्याचा अनुभव घेतला. इस्लामपूर आगारमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी येथील एसटी कर्मचाऱ्यांशी जयंत पाटलांनी संवाद साधला. त्यांच्याकडून असणाऱ्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर एसटीचीही माहिती घेत थेट एसटी बस चालवली.

ड्रायव्हर सीटवर बसून जयंत पाटलांनी एसटीचे वाहक-चालक म्हणून एसटी चालवण्याचा हा अनुभव घेतला. इस्लामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरून जयंत पाटलांनी एसटी चालवण्याचा अनुभव घेतला. यावेळी जयंत पाटील एसटी बस चालवत असल्याचं पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com