विधानसभा निवडणुकीच्यासंदर्भात जयंत पाटील यांचं मोठं विधान; म्हणाले...
मुंबईत मविआचा संयुक्त मेळावा झाला. या मेळाव्यातून बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आज आपल्या संयुक्त अशी सभा होत आहे. बऱ्याच दिवसापासून आयोजन करायचे ठरत होते. सरकार निवडणुका कधी घेणार याचा अंदाज येत नव्हता. आज निवडणूक आयोग जे पत्रकारांच्या समोर सांगणार आहे. ती माझी माहिती आहे की, हरियाणा आणि दुसऱ्या कुठल्यातरी राज्याची निवडणूक जाहीर करतील. मी अनेक ठिकाणी सांगतो की, महाराष्ट्र सरकार हे घाबरलेलं सरकार आहे. यांना निवडणुकीची भिती आहे. यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला हे घाबरले.
आता मागच्या दिड दोन वर्षात जो कारभार केलेला आहे. त्यातून महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे की काय प्रकारचं सरकार यांनी दीड वर्षात चालवलं आहे आणि म्हणून लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं एक मोठा धक्का त्यांना दिला आहे. मी अनेक ठिकाणी सांगतो यांना आता निवडणूक ऑक्टोबरमध्ये घेण्याचं धाडस होणार नाही. म्हणून निवडणूक आयोग माझी स्वत:ची व्यक्तीगत शंका आहे की, दिवाळी झाल्यानंतर हे निवडणुकांना सामोरे जातील. 15 - 20 नोव्हेंबरच्या दरम्याने हे निवडणुका घेतील. त्याच्याआधी यांची निवडणुका घेण्याची ताकद नाही. कारण लोकसभेत फार मोठा धक्का भारताच्या देशातल्या जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं दिला आहे.
यासोबतच ते म्हणाले की, 400पारचा नारा करणारे 240वर थांबले. 240वर गाडी थांबली त्यावेळी दोघांचे टेकू घेतलं. एक बिहारचा टेकू आणि एक आंध्रप्रदेशचा टेकू. दोघं एवढी पलटी मारण्यात बहाद्दर आहेत की यांचे दिल्लीचं सरकार कधी खाली येईल याचा नेम नाही. सहा महिने का वर्ष एवढाच विषय राहिलेला आहे. म्हणून लाल किल्ल्यावरुन भाषण करताना सिक्युलर सिव्हिल कोड, सिक्युलर शब्द वापरायला लागला याच्यातच तुमची हार आली. तुम्ही 10 वर्षापासून जो टेंबा मिरवला भारतात त्यात सिक्युलर शब्द कधी वापरत नव्हता. पण आता तुमच्या लक्षात आलं भारत तुम्हाला एवढा मोकळा सहजासहजी चालून देणार नाही. आज देशामध्ये काय झालं हा विषय लोकसभेला आपण उत्तर देऊन 31 ठिकाणी भाजपचा पराभव करुन आपण महाराष्ट्राच्या जनतेची भावना व्यक्त केलेली आहे. आता दोन - अडीज महिन्यानंतर विधानसभा येईल. आज आपण योग्यवेळी सर्व पक्ष एकत्रित आलो आहे. उद्धवजींनी सांगितले तसे आपण सगळं एक दिलाने, एक मुखाने राहिलो तर महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही काही चिंता करु नका पण एकमेकांना साहाय्य करणं आणि आपला महाविकास आघाडीचा त्या मतदारसंघातला उमेदवार विजयी कसा होईल हे बघण्यासाठी आपण सगळे आजपासून कामाला लागले पाहिजे.