भाजपमध्येही अंतर्गत कलह, उपमुख्यमंत्रीच नाराज : जयंत पाटील
खालेद नाज | परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परभणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडवणीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपमध्ये सुद्धा शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून प्रचंड असंतोष आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सुद्धा नाराज आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, भाजपमध्ये सुद्धा शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून प्रचंड असंतोष आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सुद्धा नाराज आहे. फडवणीस हे मुख्यमंत्री होणार होते. मात्र, ते झाले नाही. तर महाराष्ट्रातील हा सत्ता बदल कोणालाच रुचलेला नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच भवितव्य अद्यापही सुप्रीम कोर्टात आहे, सुप्रीम कोर्ट तारीख वर तारीख देत असल्याने यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली. सुप्रीम कोर्टाने सलग बसून याचा तातडीने निर्णय दिला पाहिजे, विलंबाने निर्णय देणे हे चुकीचा भाग आहे. राज्य सुरू झालं आहे. सुप्रीम कोर्ट का निकाल देत नाही याचा आश्चर्य वाटतंय. सतत बसून तातडीने निर्णय दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली. तर अनेक शिवसैनिक हे शिंदे गटात जात असल्याने यावर जयंत पाटील यांनी शिवसेनेची बाजू घेतली. कार्यकर्ते हे प्रवेश करत नाही तर पुढारी हे शिंदे गटात जात आहे. त्यांना प्रलोभन दाखवले जात आहे. तसेच, परभणीतील शिवसैनिक ढसाळला नाही. शिवसैनिक जागेवरच आहे. परभणीतील शिवसैनिक स्थिर आहे. शिवसैनिक आगामी निवडणुकीत भाजप-शिंदेला जागा दाखवतील, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.