Jayant Patil
Jayant Patil Team Lokshahi

जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटलांची राजकारणात एंट्री

सांगली राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड; संचालक पदावरून जयंत पाटलांची माघार
Published on

संजय देसाई | सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांची राजकारणात एंट्री झाली आहे. राजाराम बापू साखर कारखान्याच्या संचालक पदी प्रतीक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Jayant Patil
...त्यापेक्षा हे सरकारच अदानींच्या ताब्यात देऊन टाका; अंबादास दानवे संतापले

राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे.या निवडणुकीमध्ये संचालक पदाच्या निवडणुकीत प्रतीक पाटील आता विजयी झाले आहेत. राजराम बापू पाटील यांनी देखील आपला राजकीय प्रवास साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरू केला होता. त्यानंतर जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश देखील बँकेच्या संचालकाच्या स्वरूपात झाला होता आणि त्यांच्यापाठोपाठ आता प्रतीक पाटलांचा देखील संचालक म्हणून राजकारणातला सक्रिय प्रवेश झाल्याची चर्चा सुरु झाला आहे.

तसेच प्रतीक पाटील यांची कारखान्याच्या अध्यक्षपदी देखील निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर गेली 35 वर्ष साखर कारखान्याच्या संचालक पदी असणारे जयंत पाटील यांनी संचालक मंडळाच्या बाहेर राहणे पसंत केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com