Jayashree Patil
Jayashree Patil

Jayashree Patil : सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार

सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Jayashree Patil ) सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीला बंडखोरी केलेल्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

जयश्री पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. आज दुपारी 3 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. वसंतदादा पाटील यांच्या त्या नातसून आहेत. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात भाजपला आता मोठे बळ मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यालयात जयश्री पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com