Jayashree Balasaheb Thorat
Jayashree Balasaheb ThoratTeam Lokshahi

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर लेकीची पहिली प्रतिक्रिया; साहेब व्यथित..

जयश्री थोरात संगमनेरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना होत्या.
Published on

नाशिक : शिवसेना फुटीनंतर आता कॉंग्रेसमध्ये नवा राजकीय अध्याय पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यावर अद्याप थोरातांकडून अधिकृत विधान आले नसले तरी त्यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jayashree Balasaheb Thorat
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचा अदानींना फायदा; राहुल गांधींचा आरोप

बाळासाहेब थोरात हे व्यथीत झाल्यामुळे आम्ही सर्वजण दुःखी आहोत, अशी प्रतिक्रिया एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा व बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी दिली आहे. संगमनेर या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. त्यांचे विधान बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तावर हे शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे. यानंतर कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांकडून थोरातांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तर, दुसरीकडे बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु, चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चर्चांना फेटाळून लावले असून कोणत्याही नेत्याला प्रवेश करण्यासाठी भाजपची दारे उघडी आहेत, असेही म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com