Jaykumar Gore : "अंगावर पडलेला गुलालही अजून वाळला नव्हता तोच...", जयकुमार गोरेंचा विरोधकांवर निशाणा

जे पाकिस्तानात घडले नव्हते ते त्यांनी इथे करुन दाखवले.
Published by :
Shamal Sawant

मंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरसच्या सभेमध्ये हजेरी लावली होती. या सभेदरम्यान जय कुमार गोरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी हत्येच्या प्रयत्नात अडकवण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेदेखील सांगितले त्याचप्रमाणे जे कधी पाकिस्तानात घडले नाही ते त्यांनी इथे करून दाखवले असेही ते म्हणाले.

काय म्हणाले जयकुमार गोरे ?

माझ्या अंगावर पडलेला गुलालही अजून वाळला नव्हता, तोच मला फोन आला. आपली लढाई कायम प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. प्रस्थापितांनी विस्थापितांना कायमच अन्याय केल्याने विस्थापित लढायला उभे राहिले . माझ्या पहिल्या निवडणुकीत मी थेट अपक्ष म्हणून निवडून आलो. या वेळेला बारामतीकर खासदार होते. आमच्या भागातील सर्व आमदार त्यांचेच अगदी आम्ही दगड उभा केला तरी तो निवडून येईल, ही त्यांची भाषा होती. मात्र मी अपक्ष म्हणून निवडून आलो आणि येथूनच संघर्षाला सुरुवात झाली. माझ्या अंगावर पडलेला गुलालही अजून वाळला नव्हता. मी मुंबईला आणि दिल्लीला भेटायला जात असताना मला फोन आला की तुमच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. जयकुमार गोरेंचा बारामतीकर, अकलूजकर यांच्यावर निशाणा साधला. मी पालकमंत्री नको म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले असेही गोरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com